खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची आरोग्य विषयक व्यवस्थापन अहवाल कार्यशाळा

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.13- जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय रुग्णालय व्यावसायिंकाचे लॉगिन पासवर्ड राज्यस्तरावर प्राप्त झालेले आहे. जिल्ह्यातील 27 नोंदणी प्राप्त रुग्णालयांनी मासिक आरोग्य व्यवस्थापन भरण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा आरोग्य प्रशासनांमार्फत दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सर्व खासगी व्यावसायिकांची आरोग्य विषयक व्यवस्थापन अहवाल कार्यशाळा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय येथे पार पडली. अहवाल कार्यशाळेला जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व शासकीय व खाजगी आरोग्य संस्थांचे मासिक आरोग्य विषयक व्यवस्थापन अहवाल दर महिन्याला केंद्र शासनाच्या पोर्टलवर माहिती भरणे अनिवार्य केलेले आहे. सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने नियमितपणे भरली जात आहे.याबाबत सदर आरोग्य विषयक व्यवस्थापन अहवाल सादरीकरण जिल्हा मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी उकादास बिसेन यांनी केले.
कार्यशाळे दरम्यान डॉ. अमरीश मोहबे यांनी सर्व खाजगी वैद्यकीय रुग्णालय व्यावसायिंकाना आपल्या हॉस्पिटल मध्ये देण्यात येणार्या आरोग्य सेवांची जसे प्रसुती पुर्व, प्रसुती पस्चात तपासणी,गरोदर माता तपासणी,बालक तपासणी,नियमित लसीकरण,राष्ट्रीय किटकजन्य नियत्रंण कार्यक्रम ,राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम,राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम, राष्ट्रीय अंससर्गजन्य कार्यक्रम अंतर्गत मधुमेह, कर्करोग, रक्तदाब ,थॉयराईड असे विविध प्रयोगशाळा तपासणी अशी माहीती पोर्टलवर भरणे आवश्यक आहे तर डॉ. दिनेश सुतार यांनी जिल्ह्यात सर्व खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्याबरोबर 24 तासाच्या आत बालकांना हिपॅटायटीस-बी लसीकरण देवुन त्याची माहीति भरणे आवश्यक असल्याचे सागितले.
कार्यशाळेत कार्लेकर हॉस्पिटल, के.एम.जे हॉस्पिटल, रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल, सेंट्रल हॉस्पिटल, अलका हॉस्पिटल, बाहेकर हॉस्पिटल, आयुष्य हॉस्पिटल, राणी अवंतीबाई हॉस्पिटल, अनन्या हॉस्पिटल, बि.जे.हॉस्पिटल, राणा हॉस्पिटल, राधेकृष्ण हॉस्पिटल, सहयोग हॉस्पिटल, युनायटेड हॉस्पिटल, द्वारका मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, रत्नपारखी हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल, शुभ हॉस्पिटल, सोमानी नर्सिंग होम, कोलते नर्सिंग होम, सहारे नर्सिंग होम, देव नर्सिंग होम, धारसकर हॉस्पिटल, बालाजी नर्सिंग होम, पटले नर्सिंग होम, आशीर्वाद हॉस्पिटल, जयपुरिया नर्सिंग होम, श्री. नर्सिंग होम, गुप्ता नर्सिंग होम, सेंट्रल हॉस्पिटल इत्यादी विविध खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे संस्था रुग्णालय प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी के.टी.एस. शासकिय रुग्णालयाचे अधिपारिचारीका निलु चुटे,निशांत बन्सोड, राजेश दोनोडे यांनी मेहनत घेतली.