गोंदिया,दि.14- वर्धा जिल्ह्यातील दहेगाव गोसावी जवळीस तुळजापूर रेल्वेस्टेशन परिसरातील ओबीसी समाजातील कु.अंकीता सतीश बाईलबोडे या मुलीचा राहत्या घरी निर्घृण खून करणाऱ्यां आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला सुरु करुन फाशीची शिक्षा देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदार समशेर पठाण यांच्या मार्फेत पाठविण्यात आलेल्या निवेदनातून ओबीसी अधिकार मंचने केली आहे.निवेदनात ओबीसी प्रवर्गातील मुलीचा निर्घृण खून करणारे चारही आरोपीं जरी आज पोलीस कोठडीत असले तरी निर्ढावलेल्या मारेकऱ्यांना कश्याचाही धाक ना कायद्याची भीती राहिली नाही. अश्या मारेकऱ्यांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी खेमेंद्र कटरे,अशोक पडोळे,कैलास भेलावे,सुनिल लांजेवार,प्रेम साठवणे,दिनेश गायधने,सुनिल भोगांळे,पुरणलाल पाथोडे आदी उपस्थित होते.