गोंदिया. -गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे जिथे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी गोदाम आणि गावातील महिलांसाठी सभागृह उभारण्यासाठी क्षेत्राचे आमदार यांच्या प्रयत्नातून काम सुरु झाले आहे. मतदारसंघात सर्व 86 ग्रामपंचायतींमध्ये 86 कृषी गोदामे आणि 86 सुसज्ज महिला भवन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर योजना मिळून अभिसरण योजनेंतर्गत हे काम करण्यात येत आहेत.
आमदार विनोद अग्रवाल यांच्या या संकल्पनेचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. प्रत्येक महिला भवनासाठी 25 लाख रुपये मंजूर असून, त्याअंतर्गत गावातील बचत गटातील महिलांसाठी एक पूर्ण सुसज्ज सभागृह बांधण्यात येत आहे.
आतापर्यंत 45 ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी इमारतींना मंजुरी मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी कामे सुरू झाली आहेत, तर उर्वरित 41 ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी इमारती बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विशेष म्हणजे गोंदिया विधानसभा मतदारसंघ हे राज्यातील एकमेव क्षेत्र आहे, जिथे गेल्या चार वर्षात 18 हजार घरे मंजूर झाली असून 25 हजार मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत.
या गावामध्ये महिला भवन मंजूर..
बरबसपुरा, टेमणी, बटाना, आंभोरा, काटी, टेढ़वा, दासगाव बु., बनाथर, बिरसोला, कोरनी, कामठा, खातिया, पांजरा, चारगांव, छिपिया, आसोली, नवरगावकला, दतोरा, मुर्री, ढाकनी, पांढराबोडी, निलज, सिवनी, बघोली, तुमखेड़ा ख़ु., तांडा, चुलोद, खमारी, फुलचुर, कारंजा, चुटिया, लोहारा, किन्ही, नवेगांव धा., सोनपुरी, देवरी, लहीटोला, रजेगांव, वड़ेगाव आणि पिंडकेपार च्या समावेश.