युवाशक्ती संघटना पवनी तर्फे रक्तदान,आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबीर

0
6
पवनी : चंडिका मंदिर पवनी येथे घटस्थापना निमीत्त रविवार, दिनांक १५ ऑक्टोंबर २०२३ युवाशक्ती संघटना पवनी तर्फे रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत नेत्र तपासणी शिबीर चंडिका मंदिर पवनी येथे आयजित करण्यात आले होते. दरवर्षी घटस्थापना निमित्त युवाशक्ति संघटना पवनी तर्फे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आयोजीत करण्यात येतो या वर्षी रक्तदान शिबिर ला २० वर्षे पूर्ण झाले.
 या रक्तदान शिबिर करिता समर्पण रक्तपेढी, भंडारा तसेच मोफत आरोग्य तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय, पवनी आणि नेत्र तपासणी करीता इंद्राक्षी आय केअर, भंडारा आले होते. या रक्तदान शिबिर ला ४० रक्तदात्यांनीं रक्तदान केले, मोफत आरोग्य तपासणी चा ११६ नागरिकांनी लाभ घेतला आणि मोफत नेत्र तपासणी चा ११२ नागरिकांनी लाभ घेतला.
 या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी युवाशक्ती संघटना पवनी चे अध्यक्ष देवराज बावनकर, बंडू बावनकर, विवेक रायपुरकर, दिपक बावनकर, मोनु मुंडले,सचिन मुंडले, राहुल नंदनवार, कार्तिक अंडेलकर, डेविड उंबरकर, मिलींद बोरकर, दुर्गेश बावनकर, योगेश बावनकर आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.