उपाशीपोटी राहण्याची वेळ
चार महिन्यापासून रखडले अनुदान
देवेंद्र रामटेके/गोंदिया-(ता.17)-मागच्या चार महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने जिल्ह्यातील संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी त्यांच्यासमोर जगावे की मरावे असा प्रश्न उभा ठाकला आहे.
ऐकट्या गोंदिया तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत 7110 तर श्रावण बाळ वृद्धपकाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14930 एवढी आहे. या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना मागच्या चार महिन्यापासून अनुदान वाटप न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी उद्भवली आहे.
समाजातील विधवा, निराधार,परित्यकता महिला,दुर्धर आजार ग्रस्त, अपंग तसेच पासस्ट वर्षावरील गरीब गरजू व्यक्तींना त्यांचे योग्य प्रकारे संगोपन व उपजीविका व्हावी म्हणुन संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतून एका ठराविक रकमेच्या स्वरूपात त्यांना आर्थिक मदत अनुदान म्हणुन देण्यात येतो. परंतू मागच्या जुलै महिन्यापासून या गरीब व गरजू लाभार्थ्यांना अनुदानच वाटप झाले नाही. हिच परिस्थीती संपूर्ण जिल्हाची आहे. या योजनेतील लाभार्थी हे अत्यंत गरीब व आर्थिक परिस्थिती खालावलेली असतात त्यामूळे त्यांची उपजीविका पूर्ववत सुरु राहण्यासाठी त्यांना वेळेवरअनुदानाची गरज असते परंतु मागच्या चार महिन्या पासून त्यांना अनुदान न मिळाल्याने त्यांच्या पुढे उपासमारीचा मोठा प्रश्र्न उभा ठाकला आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे अश्या काळात ही गरिबांना अनुदान वेळेवर मिळत नसल्याने या लाभार्थ्यांनी आपली व्यथा कुणापुढे मांडवी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळी होणार अंधारात?
येणाऱ्या काही दिवसात दिवाळी हा सण येत आहे अश्यातच दिवाळीतही अनुदान मिळणार की नाही यात शंका उ्पन्न होत आहे. त्यामूळे या गरिबांची दिवाळी अंधारात तर होणार नाहीं ना असा प्रश्र्न पडणे स्वाभाविक आहे.
अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. अनुदान प्राप्त होताच वाटप करण्यात येईल.-सिमा पाटणे नायब तहसीलदार गोंदिया.