35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटचा मृत्यू

0
19

blank

गोंदिया : गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया-गोरेगावदरम्यान कारंजा येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलाडताना एका काळवीटला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात काळवीटचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

गोंदिया-कोहमारा या मार्गावरून प्रवास करीत असलेल्या गोंदियातील बेळगे कुटुंबीयांनी ही माहिती ‘हिरवळ’ संस्थेचे पक्षीमित्र रुपेश निंबार्ते यांना दिली. त्यांनी या घटनेबद्दल वनविभागाचे गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी आकांक्षा भालेकर यांना कळविले. त्यांनी वनविभागाचे क्षेत्र सहायक कडू व  वनरक्षक काळबांधे या दोघांना तत्काळ घटनास्थळी पाठविले. तोपर्यंत काळवीटचा मृत्यू झाला होता.

blank