गोंदियात भांडे गोदामाला आग; गोदामातील साहित्य जळून राख

0
12

गोंदिया : शहरातील मुख्य बाजारपेठेतील नगर परिषदे समोरील सत्यम व्हिडिओ गल्लीतील एका भांडे दुकान आणि लागूनच असलेल्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना आज मध्यरात्री ला १२:३० च्या सुमारास अचानक घडली. या बाबतची माहिती गोंदिया नगर परिषदेतील अग्नीशमन विभागाला मिळताच लगेच घटनास्थळ गाठून या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. पण या आगी ने भांडे गोदामा शेजारील एका जनरल स्टोअर्सच्या दुकानाला पण आपल्या कवेत घेतले असल्याने आगी चे स्वरुप काही काळा पुरते विक्राळ झाले होते. करिता घटना स्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियातील ६ अग्नी शमन दलाच्या गाड्या घटनस्थळी दाखल करण्यात आले होते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तिरोडा नगर परिषदेतील व गोरेगांव नगर पंचायत येथील अग्नी शमन दलाच्या गाड्याना पण मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते.

अखेर तीन तासा नंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाला यश आले. अन्यथा मोठी घटना होण्याची शक्यता होती. या आगी मध्ये गुरुनानक बर्तन भंडार व त्यांचे गोदामातील समान आणि ओम जनरल स्टोअर्स मधील शृंगाराच्या ठेवलेल्या साहित्य जळून त्यांची राख रांगोळी झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तर ही आग कश्यामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. सध्या शारदा नवरात्र सुरू असून मोठ्या प्रमाणात देवी बघण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात बाजार परिसरात फिरत असल्याने आग लागल्याचे कळताच आग बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मोठीकसरत करावी लागली. आग लागल्याची घटनेची माहिती कळताच आमदार विनोद अग्रवाल, माजी नगरसेवक दिलीप गोपलानी,नगर परिषदेतील मुख्याधिकारी करण चौहान आदि घटनास्थळी पोहोचले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गोंदिया नगर परिषद अग्नीशमन दलाच्या लोकचंद भांडारकर, कमल राखडे, सत्यम बिसेन, मोहनिष नागदवणे, जितेंद्र गौर, मुकेश माने, राजेश भरणे,वाहन चालक कावडे, कनसरे, अजय शहारे, रणजित रहांगडाले आदींनी आपले कर्तव्य बजावले.