: अमृत कलश यात्रेत हजारोंची उपस्थिती
——
गोंदिया, ता. 25 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. हतात्म्यांचे स्मरण प्रत्येक देशावासीयांचे कर्तव्यच असून देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण हे प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गोंदियाच्या वतीने नगर परिषद इंदिरा गांधी स्टेडीयम येथून आज (ता. 25 ) अमृत कलश यात्रा काढण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद गोंदियाचे अर्थ व बांधकाम समिती सभापती योपेंद्रसिंह टेंभरे, महिला बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे, उपसभापती राजकुमार यादव, देवरी पंचायत समितीचे उपसभापती अनिल बिसेन, आमगाव पंचायत समितीचे सभापती राजेंद्र गौतम, तिरोडा पंचायत समितीच्या सभापती कुंताबाई पटले, उपसभापती हुपराज जमईवार, देवरी पंचायत समितीचे सभापती अंबिका बंजार, सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती संगीता खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरी बघेले, ॲड माधुरी रहांगडाले, प्रविण पटले, लक्ष्मी तरोणे, डॉ. लक्ष्मण भगत,हनुवंत वट्टी,किशोर महारवाडे, निशा तोडासे, अंजली कटरे यावेळी मंचावर उपस्थित होते.
पंकज रहांगडाले पुढे म्हणाले की, जिल्हयातील गावागावातून माती संकलित करण्यात आली. ही माती मुंबईला पाठविण्यात येत आहे. राष्ट्रीयस्तरावर तयार होणाऱ्या अमृत वाटीकेत ही माती वापरली जाणार आहे. ही आपल्या जिल्हयासाठी अभिमानास्पद आणि गौरवाची बाब असल्याचे सांगून राष्ट्रीय उपक्रमांत सर्वांनीच सहभाग घेण्याचे त्यांनी याप्रसंगी आवाहन केले. सभापती श्री. योपेंद्रसिंह टेंभरे यांनी भारत मातेची घोषणा देत देशातील विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. सभापती श्रीमती सविता पुराम यांनी अमृत कलश यात्रेत महिलांच्या योगदानावर भर देवून हा उपक्रम भारताला एकसंघ करणार असल्याचे मत व्यक्त केले. गोंदिया पंचायत समितीचे सभापती यांनी आयोजनाची भूमिकेवर भर देवून ही माती बलिदान आणि त्यागाची सदैव आठवण देत राहणार असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हा परिषद पंचायत विभागाचेे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. आर. खामकर यांनी प्रास्ताविक करून अमृत कलश यात्रेचे आयोजन, त्यामागणी भूमिका आणि त्यातील लोकसहभागाची माहिती दिली.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटेरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रूती डोंगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. एम. आर. गजभिये, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. कातींकुमार पटले, गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, सडक अर्जुनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप खोटेले, सालेकसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविंद्र पराते, आमगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना आयचित. देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.एम.रहांगडाले यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि अमृत कलशांचे पूजन करण्यात आले.राष्ट्रगीत घेवून अमृत कलश यात्रेला सुरवात करण्यात आली. नेहरू पुतळा, गोरेलाल चौक, दुर्गा चौक पुढे कुडवा लाईन मार्गाने अमृत कलश यात्रा रेल्वेस्टेशनला पोचली. केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची टोपी घालून तथा भारतीय तिरंगा घेवून पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी अमृत कलश यात्रेत सहभागी झाले. देशभक्ती गीत आणि उद्घोषणांनी संपूर्ण परिसर चांगलाच निनादला. जिल्हा समन्वयक सतीश लिल्हारे यांच्या नेतृत्वात नेहरू युवा केंद्राचे 17 स्वंयसेवक यांना यावेळी मान्यवरानी निरोप देवून कलश मुंबईला रवाना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोंदियाचे सहायक गटविकास अधिकारी डी. आर. लंजे, विस्तार अधिकारी कार्तिक चव्हाण, विस्तार अधिकारी आर. जे. बन्सोड, विस्तार अधिकारी सुरेश निमजे, विस्तार अधिकारी सितेश पटले, कविता राठोड जिल्हा परिषद पंचायत विभागातील तथा पंचायत समिती गोंदिया येथील कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
——
देशभक्तीची भावना जागृत ठेवा-जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये देशभक्तीची भावना, आपल्या माती विषयी कृतज्ञतेची भावना असली पाहीजे. त्यासाठी या कार्यक्रमाचे फार महत्व असल्याचे मत अमृत कलश यात्रेला निरोप देतांना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केले. यात्रेसाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली. जिल्हयातील सर्वच तालुक्यातून हे कलश मुंबईला पाठविण्यात येत आहेत. दिल्ली येथील कर्तव्य पथावरून स्वयंसेवकांचे पथसंचलन हा आपल्या जिल्हयासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण राहणार असल्याचे मतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. दरम्यान त्यांनी सर्व स्वयंसेवकांची रेल्वेस्टेशन येथे भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.