खा. प्रफुल पटेलांच्या पुढाकाराने धान खरेदीचा तिढा सुटणार

0
49

३० आक्टोबर ऐवजी १ नोव्हेंबरला मंत्रालयात बोलावली बैठक

गोंदिया : धान खरेदी संस्थांच्या अडीअडचणी, धान खरेदी संदर्भातील जाचक अटी शर्ती यामुळे खरीप हंगामाच्या धान खरेदी केंद्र सुरु करण्यात होणार विलंब लक्षात घेत खा.प्रफुल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल यांच्याशी चर्चा केली. दरम्यान धान खरेदी साठी आडकाठी येणारे सर्व समस्या मार्गी लावण्याचा अनुशंगाने बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती या अनुरूप ३० आक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली बैठक १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत खा.प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन हे उपस्थित राहणार असून धान खरेदीचा तिढा सोडविणार आहेत. विशेष म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भूजबल, आदिवासी विकास मंत्री ना.विजय गावित यांच्या सह गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच पणन व आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थीत राहणार आहेत.

गोंदिया भंडारा सह पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे धान उत्पादक आहेत. शेतकऱ्यांचे धान नियम व अति शर्ती च्या अंतर्गत संस्थांच्या माध्यमातून शासकीय आधारभूत किमतीमध्ये खरेदी केली जाते. मात्र पणन विभागाकडून कमिशन मध्ये घट, खरेदी करणाऱ्या संस्थांवर बोजा चढविणे हुंडी जमा करणे, धानाच्या आद्रतेतून होणारी तूट कमी या जाचक अटी शर्ती मुळे संस्थांपुढे धान खरेदी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे धान खरेदी करण्यास संस्था मागे पुढे पाहत आहेत. परिणामी अद्याप पर्यंत धान खरेदी केंद्र सुरु झाली नाही तर दुसरीकडे खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आले आहे. अल्पमुदतीच्या धानाची कापनी व मळणी सुरु झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. तसेच मशागतीचा वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांना बोनस देणे गरजेचे आहे हि बाब माजी आमदार राजेंद्र जैन यांनीं खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनात आणून दिली. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी धान खरेदी सुरु करण्यात येणाऱ्या अडी अडचणी मार्गी लावण्या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबल यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात बैठक बोलावून खरेदीचा तिढा सोडविण्यात यावा अशी विनंती केली होती या अनुरूप अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय तर्फे बैठक बोलावण्यात आली होती मात्र ती बैठक अपरिहार्य कारणांमुळे १ नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत खा. प्रफुल पटेल, आदिवासी विकास मंत्री ना.विजय गावित यांच्या सह माजी आमदार राजेंद्र जैन, गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्व आमदार यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे त्याच प्रमाणे पणन व आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी उपस्थीत राहणार आहेत.

या बैठकीच्या माध्यमातून खा. प्रफुल पटेल हे धान खरेदी, शेतकऱ्यांना बोनस सह शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्यात अग्रणी भूमिका निभावणार आहेत.