अर्जुनी मोरगाव,दि.30-जिल्हा परिषद हायस्कूल नवेगावबांध येथे एकात्मिक आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.या नाटकाचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,भारत देशात १७३५ वर्षे राज्य करणारे आदिवासी गोंड राजे त्यातील एक राज्यकर्ती म्हणजे वीरांगना राणी दुर्गावती, पतीच्या निधनानंतर गढमंढला चा राज्यकारभाराची धुरा स्वतः च्या खांद्यावर घेऊन मुघल साम्राज्याचा नाकी नऊ आणणारी,जनतेच्या समस्या आपल्या समस्या समजुन निराकरण करणारी, जातीव्यवस्था झुगारून आपल्या सैन्यात धर्मनिरपेक्षता जपणारी आदर्श व कुशल राज्यकर्ती राणी दुर्गावती,भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वात जास्त आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले परंतु शोकांतिका आहे की आपण इतिहासात कुठेही दिसत नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की,”जो अपना इतिहास नाही जानते वे कभी अपना इतिहास नही बना सकते” परंतु कासवगतीने का होईना आदिवासी समाज आपला इतिहास जाणु लागला आहे.आणि सामाजिक क्रांती घडविण्यासाठी वाटचाल करीत आहे.माझ्या आदिवासी समाज बांधवांनी नाचण्यापेक्षा वाचनावर लक्ष केंद्रित करून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक क्रांती घडवून आणा.त्यासाठी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा अभ्यास करा.असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा लेखक दशरथ मडावी,जि.प.सदस्या रचनाताई गहाणे, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, उपसरपंच रमन डोंगरवार, दिग्दर्शक राजु बोरसे व हजारो नाट्यरसिक उपस्थित होते.