स्वच्छ भारत अभियानासाठी इर्री ग्रामपंचायत झाली सज्ज

0
10

अनेक उपक्रमांचे आयोजन
*देवेंद्र रामटेके*
गोंदिया-(ता.30) येणाऱ्या काही दिवसात जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गाव पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.त्या अभियानात भाग घेण्यासाठी गोंदिया तालुक्यातील इर्री ग्रामपंचायत सज्ज झाली असून तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने अनेक लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात सुरुवात केली आहे.
येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण जिल्हा पातळीवर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रा.पं.इर्री प्रशासनाने कंबर कसली असून त्यासाठी गावातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, व इतर शासकीय इमारतींची रंगरंगोटी करण्याच्या कामाला युद्ध स्तरावर सुरुवात करण्यात आली आहे. त्याखेरीज गावातील सांडपानी व्यवस्थापन,अंतर्गत रस्ते दुरुस्ती व रस्ते स्वच्छता, घरोघरी शौचालयाची निर्मिती तसेच शौचालयाच्या वापरासंबंधी जनजागृती, शालेय व अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी खेळाची साहित्य व शैक्षणिक साहित्य तसेच हेंडवाश पुरवठा, दररोज हात धुण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.गावातील महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक प्रशिक्षण राबविण्यात आले. याशिवाय “आमचा गाव आमचा विकास”आराखडा अंतर्गत महिला सभा,बाल सभा, वंचित घटकांची सभा, वार्ड सभा, व विशेष सभा घेऊन त्यात गाव विकासासंबंधात नागरिकांकडून सूचना तसेच अभिप्राय मागून त्यांच्यावर कार्य सुरु करण्यात आले आहे.शिवाय आपले गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहावे तसेच गाव स्वच्छता निरंतर टिकून राहावे म्हणून येथील जि. प. सदस्या लक्ष्मी तरोने,ग्रामविकास अधिकारी रामा जमईवार यांच्या मार्गदर्शनात सरपंच देवानंद गडपायले,उपसरपंच भाऊलाल तरोणे,सदस्य मनीराम उपवंसी,दिलीप ब्राह्मणकर, जितेंद्र वरखडे, उर्मिला उपवन्सी, धनवंता वरखडे, सयवंता नागपुरे, चित्ररेखा चौधरी, वर्षा चव्हाण परिचर सुनिल ठकरेले युद्ध पातळीवर परिश्रम घेत आहेत.