गोंदिया : सामाजिक दृष्टीकोणातून कार्य करतांना उणिवा होत असतात. याच उणिवाला पकडून समाजातील काही व्यक्ती समाज हिताला जोडण्यापेक्षा विभाजीत करण्याचे कार्य करीत असतात. एकंदरीत हे कार्य समाज हितासाठी उपयोगी नाही, तेव्हा जोडण्याचे कार्य व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय पवार(पोवार,पंवार)क्षत्रिय महासभा भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. मुरलीधर टेंभरे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक पोवार बोर्डिंग येथे आयोजित कोजागिरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
स्थानिक पोवार बोर्डिंग येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार(पोवार,पंवार)क्षत्रिय महासभा भारतचे अध्यक्ष इंजी. मुरलीधर टेंभरे तर उदघाटक म्हणून लोकजनचे मुख्य संपादक प्रा.एच.एच.पारधी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष अॅड. पृथ्वीराज चव्हाण, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले, राष्ट्रीय पवार(पोवार,पंवार)क्षत्रिय महासभा भारतचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे, कवि अॅड. देवेंद्र चौधरी, महिला समितीच्या अध्यक्षा सौ. धनिषा कटरे, युवा समितीचे अध्यक्ष रजत गौतम यासह मान्यवर मंचावरसंख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना इंजि. टेंभरे यांनी महासभेच्या वतिने विखुरलेल्या समाजाला एकटवण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगितले. मात्र समाजातील काही पुढारी यात विनाकारण तेढ निर्माण करीत आहेत. परिणामी हे समाज जोडण्याचे नाही तर तोडण्याचे काम आहे, तेव्हा समाजातील वरिष्ठांशी चर्चा विमर्श करूनच असे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.पटले यांनी समाजातील युवकांनी नीट जेईईच्या परिक्षेसोबतच पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.खेमेंद्र कटरे यांनी नवयुवक समिती व महिला समितीने युवक व महिलांच्या हिताकरीता कॅरियर मार्गदर्शन शिबिरासारखे कार्यक्रम आयोजित करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.एच.एच.पारधी यांनी समाजाला संगठित करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात समाजाची होत असलेली घसरण थांबविण्यासाठी राजकीय विचारधारा सोडून समाजहित म्हणून विचार करण्याची गरज असल्याचे विचार मांडले.कार्यक्रम दरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह पवार सेवा स्वर्गरथ समितीच्या सदस्यांचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. दरम्यान महिला समिती तसेच नवयुवक समितीच्या कार्याची दखल घेवून त्यांचे अभियनंदन करण्यात आले.कोजागिरीचे औचित्य साधून मंचच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. याकरीता बंटी बोपचे, रजत गौतम व किशोर भरत यांच्यासह नवयुवक समिती व प्रगतिशिल मंच पदाधिकारी आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना अॅड. संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. तर कार्यक्रमाचे संचालन सचिव डॉ. प्रिती गौतम तर आभार कार्यकारीणी सदस्य बंटी बोपचे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगितांने करण्यात आली. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.