सालेकसा येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा

0
17

सालेकसा,दि.३१- स्थानिक आदिवासी मुले आणि मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आज मंगळवारी (दि.३१) राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गावातून प्रभात फेरी काढून जनतेला एकतेचा संदेश देण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांघी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सालेकसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रीय एकचा दिवस या विषयावर रांगोळी, निबंध आणि वकृत्व कला या विषयावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रास्ताविक गृहपालिका मीनाक्षी बढे यांनी केले. संचलन पूजा आणि प्रियंका या विद्यार्थिनींनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गृहपाल अक्षय ढोरेकर, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.