31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास प्रथम प्राधान्य द्या

सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास प्रथम प्राधान्य द्या

0
24

blank

चंद्रपुर . स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – 2 अंतर्गत जिल्हा परिषद येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा नुकताच आढावा घेण्यत आला असुन, चंद्रपुर जिल्हा हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी गावस्तरावरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे कामे वेळेत होणे आवश्यक आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील गावे हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी  सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास प्रथम प्राधान्य देवुन कामे करावे. असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी यत्रंणेला दिले.

            आढावासभेत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय नळजोडणी , पाणी गुणावत्ता बाबत आढावा घेण्यात आला.  सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचे नियोजन करुन वेळेत पुर्ण करा, आवश्यक त्या लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ द्या, वेळापत्रकानुसार  गावातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करा.  योजनेची सर्व कामे वेळेत पुर्ण करा. अशा प्रकारच्या सुचना मा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी आढावा सभेत संबधीत यंत्रणेला दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांणी व स्वच्छता नूतन सावंत, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे सर्व जिल्हा सल्लागार, पंचायत समितीस्तरावरील गट समन्वयक, समुह समन्वयक उपस्थित होते.

blank