नाचुन जयंती साजरी करण्यापेक्षा वाचुन साजरी करा:-इंजि.यशवंत गणविर

0
29

अर्जुनी मोर. :-आदिवासी संघटना विकास मंच प्रतापगडच्या वतीने आयोजित आदिवासी सांस्कृतिक नृत्य स्पर्धा या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वाधिक आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले.पण ते इतिहासात अलिप्त झाले.परंतु आज आदिवासी बांधवांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपल्या समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास गवसला.क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांना फक्त पंचवीस वर्षाचे अल्पायुष्य लाभले वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी सन १८८९ मधे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उलगुलान पुकारला.त्यांना सडो की पडो करुन सोडले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बिरसा मुंडा प्रमाणेच शहीद वीर बाबुराव शेडमाके, वीर सिताराम कंवर, गोंदिया जिल्ह्यातील सुपुत्र क्रांतीवीर नारायण सिंह उईके,टंट्या भिल,शामदादा कोलाम, वीरांगना राणी दुर्गावती या सारख्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की,जो अपना इतिहास नही जाणते वे अपना इतिहास नही बना शकते, म्हणून आपला इतिहास जाणून घ्या आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल आपल्या महामानवांची जयंती नाचुन नाही तर वाचुन साजरी करा कारण वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.तेच ज्ञान समाज हितासाठी उपयोगी पडते.असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला भोजराम लोगडे,तेजराम राउत, योगेश जनबंधु, डॉ प्रवीण चांदेवार, तेजराम मडावी, पौर्णिमा वालदे,सौरभ पशिने, सुरेश मडावी, सुरेश मळकाम तथा गावकरी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.