मुंबई येथील पर्यटकांच्या गाडिला अपघात ; अपघातात १ मृत ४ गंभीर जख्मी

0
12

लोणार … लोणार सरोवराच्या जवळ किन्ही रोडवर आज, १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ईनोव्हा गाडिचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने लोणार वरुण समृद्धि मार्गे मुंबई कड़े जाणाऱ्या एम एच ०१ ए एक्स ९८९८ क्रमांकांच्या इनोव्हा कारने ३ – ४ पलट्या खाल्ल्या या अपघातात १ जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई येथील काही पर्यटक सुट्टी निमित्त पर्यटना ला निघाले होते सकाळी शेगांव चे दर्शन करून हे पर्यटक लोणार पाहण्यासाठी आले होते .लोणार मधील पर्यटन स्थळ पाहुन समृद्धि मार्गे परत मुंबई कड़े जात असतांना किन्ही जवळी ल अरुंद मार्गावर चालकाचा तोल गेला आणि गाड़ीने रस्त्याच्या कड़ेला जाऊन पलटया मारल्या. दरम्यान अपघात मध्ये सूरज शिवाजी गुडवे (२५, रा. ठाणे) यांचे निधन झाले आहे. तर उर्वरित जखमीना जालना येथे उपचारा साठी हलविन्यात आले आहे. लोणार सरोवराच्या किन्ही गेट समोर सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सूर्यकांत शिवाजी गुडवे वय २७, निहाल संदीप सुर्वे वय १ वर्ष, साहिल संजय गुडवे वय २० वर्ष ,नीता संदीप सुर्वे वय ३३ वर्ष हे गंभीर जखमी आहे.