नितेश कराळे रविवारी गोंदियात

0
10

संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग

गोंदिया ( ता.25) -डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कुडवा यांच्या वतीने रविवारी (ता.26)संविधान गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी बहुजन चळवळीतील प्रमुख वक्ते तसेच फिनिक्स अकॅडमी वर्धा चे संचालक नितेश कराळे हे कुडवा येथील भारतीय बौद्ध विहारा (दासगाव रोड)च्या प्रांगणात आयोजित संविधान दिवस कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाची सुरूवात भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड हे राहणार आहेत.तर सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ. विनोद अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल दस्तकचे वरिष्ठ संपादक संभुसिंह, एअरपोर्ट ऑथॉरिटी चे डीजीएम कमलेश मेश्राम, जिल्हा उप निबंधक शुद्धोधन कांबळे,जि.प.समाज कल्याण सभापती पूजा शेठ,सहयोग समूहाचे संचालक जयेश रमादे, वरिष्ठ पो.नि.राजेंद्र निकम, आवाज इंडिया टीव्ही चे संपादक अमन कांबळे, भुवैज्ञानिक तरुणा पाटील, पो.नि.(वाहतूक) महेश बनसोडे, पो. नि. संदेश केंजळे, पो. नि. चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र वैद्य, पो.नि.सरीन दुर्गे,डॉ. सनम देशभ्रतार,पो.नि.अनिल पाटील,जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी रोहिणी सागरे, सा.आयुक्त राजू माटे, सा.अभियंता अभिजीत बागडे,पो.नि. राहुल पाटील, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये,पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, जॉब्स ग्लोबल सोलुशन चे संचालक जगदीश डबरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बांबोडे,सहायक पोलीस निरीक्षक मनोज खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता सिरीसमामा फुलझेले, सहायक पोलीस निरीक्षक राजू वस्तवाडे, सा. पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसंगे, पोलीस उपनिरीक्षक निलेश भिलावे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे,पोलीस उपनिरीक्षक विशांत नांदगावे,डॉ. असीम गजभिये, डॉ. पायल बघेले,डॉ. मोहित गजभिये,डॉ. सोनाली वैद्य, डॉ.निशांत करवडे, डॉ. कैलास नगराळे,डॉ. उमाकांत मेश्राम,सहायक पोलीस निरीक्षक विजय गराड, खुशाल राऊत, विक्रीकर निरीक्षक रोहित मेश्राम, विक्रीकर निरीक्षक अर्चना मेश्राम, मुख्याध्यापक बालमुकुंद फुले, सा.पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मुख्याध्यापक गिरहेपुंजे, पोलीस उपनिरीक्षक प्रीती सुरडकर, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मेश्राम तथा इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कुडवा यांच्या वतीने करण्यात आले असून यावेळी बौद्ध विहार सांस्कृतिक केंद्राच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.यावेळी सुप्रसिद्ध आंबेडकरी जलसाकार शुद्धोधन गराडकर, संघर्ष भगत तसेच जयभीम फेम विपिन तातड यांच्या वतीने संगीतमय प्रबोधन सादर करण्यात येणारं आहे.परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कुडवा तर्फे करण्यात आले आहे.