महिला भगीणिंचे रक्षण करणे ही पोलीस बंधुंची जबाबदारी

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोर.– भारतात रक्षाबंधन आणी भाऊबिज हे दोन सण महिलांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतात. महिला कितीही आदिशक्ती असली तरी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वर्तमान काळात कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.त्यामुळे रक्षाबंधन आणी भाऊबिज यामुळे महिला व पुरुषांमध्ये बहीण भावांचे नाते अधिक वृंदिगत होते.त्यामुळे पोलीस बंधुनी महिला भगीणिंची रक्षा करावी असे भावनिक आवाहन प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री तथा जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी केले आहे.
दिवाळी नंतर लगेच सुरु होणा-या भाऊबिजेच्या पावनपर्वावर तालुक्यातील धाबेपवनी ए ओ पी कॅम्प येथे पोलीस कर्मचारी यांना ओवाळणी निमित्त आयोजीत कार्यक्रमात रचनाताई गहाणे बोलत होत्या.

दिपावळी आली की स्नेहाचा हर्ष चौफेर भरलेला असतो.बहीण भावाच्या आपुलकीचा स्नेहाचा सोहळा म्हणजे भाऊबीज.प्रत्येक वर्षी येणाऱ्या भाऊबीज सणाचे औचित्य साधून रचनाताई गहाने प्रदेश महीला मोर्चा महामंत्री तथा जिल्हा परिषद सदस्या गोंदिया यांच्या नेतृत्वाखाली AOP कॅम्प धाबेपवणी येथे उपविभागीय पोलीस उपनिरीक्षक मा.संदीप भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊबीज उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी मीना शहारे सरपंच महालगांव, पूजा कापगते ग्रा.सदस्या नवेगावबांध, आशा डोंगरावार,गजेंद्र राऊत ( स.फौ.), प्रशांत पंचबुद्धे ( स.फै.),आनंदराव मेश्राम (पो.हवा),शशिकांत भेंडारकर (पो.शि.),दिपक कराड (पो.शि.),रमेश धमगाये (पो.शि.),मुकुंद बोरघरे (पो.शि.),सौ.शोभा उसेंडी आणि इतर मंडळी या उत्सवाला प्रामुख्याने उपस्थित होते.