ओबीसी विद्यार्थिनींसाठी वस्तीगृह त्वरित सुरू करा – जिल्हा परिषद सदस्या विद्याताई कुंभरे

0
13

जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंभरे यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले जयंतनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

लाखनी,दि.04– राज्य सरकार नाट्यगृह बांधीत आहे पण ओबीसी मुला – मुलींसाठी 72 वस्तीगृह बांधून देत नाही.अनुसूचित जाती – जमातीच्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृह आहेत पण ओबीसी मुलींसाठी एकही वस्तीगृह नाहीत .राज्य सरकारने 72 वस्तीगृह बांधण्याची घोषणा केली पण अजून एकही वस्तीगृह सुरू केले नाहीत ते त्वरित सुरू करावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई कुंभरे यांनी केली त्या लाखनी येथे ओबीसी सेवा संघ आणि शिक्षक भारती शासनमान्य संघटनेच्या वतीने आयोजित सावित्री फुले जयंती कार्यक्रमात बोलत होत्या.
विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांची 194 वी जयंती लाखनी येथे ओबीसी सेवा संघ व शिक्षक भारती शासनमान्य संघटनेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे , तर प्रमुख अतिथी शिक्षक भारती संघटनेचे विभागीय संघटक प्रविण गजभिये, जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे ,कार्यवाह विनोद किंदर्ले,कार्याध्यक्ष खेमराज परशुरामकर, प्रा. विलास पुरणे ,महिला प्रतिनिधी संगीता वाघाये,प्रा.डॉ. भूमेश्वरी वाघाये,प्रा.स्मिता तितरमारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. बालिका दिनाचे औचित्य साधून अवंती सिंगनजुडे,वीरा कुंभरे,आस्था बांते,रिया कुंभरे या बलिकांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांच्या हस्ते प्रा.मनिषा सपाटे , सेवानिवृत्त शिक्षिका गीता वाढई ,महिला पोलीस प्रतिभा खोटेले,उद्योजक नोबिना बडवाईक,ग्रामसेवक रजनी बावनकुळे यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाईं आणि सह शिक्षिका फातिमा शेख यांच्या जीवन कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे म्हणाल्या महिलांनी 3 जानेवारी हा दिवस सण उत्सवप्रमाने साजरा करावा हा दिवस स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा दिवस आहे. प्रमुख अतिथी प्रविण गजभिये म्हणाले महिलांना संविधानाने हक्क आणि अधिकार दिले त्याची जाणीव ठेवावी , जिल्हाध्यक्ष प्रा.उमेश सिंगनजुडे म्हणाले सावित्रीने आपलं सर्वस्व स्त्री जातीच्या उद्धारासाठी अर्पण केले , महिलांनी सावित्रीच्या हा वसा आणि वारसा पुढे न्यावा,प्रा.डॉ. भुमेश्र्वरी वाघाये म्हणाल्या सावित्रीने स्त्री समाजासाठी जो त्याग केला त्या त्यागाची जाणिव ठेवावी. विनोद किंदर्ले म्हणाले शिक्षक भारती ही संघटना स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारी लढाऊ संघटना आहे महिलांनी शिक्षक भारती संघटनेमध्ये सहभागी व्हावे. बालवक्त्या अवंती सिंगनजुडे म्हणाली पालकांनी मुलींच्या लग्नावर अधिक खर्च न करता मुलींच्या शिक्षणावर अधिक खर्च करावा.सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केक कापून साजरा केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भारती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष देवराम फटे , प्रस्ताविक तालुका अध्यक्ष नितीन वाघाये आभार रुपेश नागालवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत भुसारी ,संजय वनवे,पद्माकर सावरकर, सतीश टिचकुले,गोपाल नाकाडे,अभय भदाडे,हिवराज कमाने,जगदीश धांडे,सुधीर कुंभरे,नाना राघोर्ते,चेतन उके,विनोद बांते, राजकुमार खोब्रागडे,सचिन तितीरमारे,अर्चना बांते,तृप्ती बावणे,रश्मी भुसारी ,पूजा रोकडे,रजनी धांडे,प्रमिला लामकाने,सौ. मोहतुरे,सौ खोब्रागडे ,सौ.करंजेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.