वापरायोग्य नसलेल्या ५१ कोटी ७१ लक्ष रुपयाच्या मुद्रांकाचे निर्लेखन

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया, दि.४ : जिल्हा कोषागार गोंदिया येथील वापरायोग्य नसलेल्या ५१ कोटी ७१ लक्ष ९५ हजार १४० रुपये किमतीच्या मुद्रांकाचे शासकीय नियमानुसार निर्लेखन करण्यात आले.

         महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तसेच नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा कोषागार कार्यालय गोंदिया यांचे अधिनस्त सुरक्षा कक्षातील शिल्लक असलेल्या परंतु वापरायोग्य नसलेल्या मुद्रांकांचे निर्लेखनाचे “जिल्हा मुद्रांक निर्लेखन समिती” समक्ष एकूण रु.५१,७१,९५,१४० (अक्षरी रु. एक्कावन्न कोटी एकाहत्तर लक्ष पंच्यानऊ हजार एकशे चाळीस फक्त) चे मुद्रांक निर्लेखनाचे काम जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया येथे २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले.

         निर्लेखनसमयी के. एस. कांबळे, सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोंदिया (अतिरिक्त कार्यभार), चं. रा. आंबोळे, कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय गोंदिया, नि. ल. पदमेरे, अप्पर कोषागार अधिकारी (मुद्रांक) गोंदिया, तसेच कोषागार कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी यांनी कोषागार अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण मुद्रांकाची मोजणी करुन तसेच सदर मुद्रांकाचे व्यवस्थीत बारीक बारीक तुकडे करुन मुद्रांक निर्लेखनाची कार्यवाही योग्यरित्या पार पाडली. वापरयोग्य नसलेले मुद्रांक नष्ठीकरण्याची कार्यवाही नियमानुसार करण्यात आली असल्याचे कोषागार अधिकारी चं.रा.आंबोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.