खांबी गावातील पथदिवे महिन्याभरापासून बंद

0
8

अर्जुनी मोरगांव -तालुक्यातील खांबी मुख्य गांव असून या गावातील काही पथदिवे मागील एका महिन्यापासून बंद असल्याने रात्रीला गावातील रस्त्यावर अंधाराचा काळोख असतो. रात्रीच्या सुमारास गावात फिरायला जायचे म्हटले तर रस्त्यावर अंधार असल्याने माणसाला पाहून कुत्र्याचे भुंकणे चालू होते. आणि वाघांची शुद्धा धुमाकूळ असल्यामुळे रात्रीच्या सुमारास रस्त्यावर निघायला सुद्धा भीती वाटते तरीपण मागील एका महिनाभरापासून गावातील पथदिवे बंद असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसते आहे. आणि आता हिवाळा ऋतू सुरू असतांना जमिनीवर सरपटणारे प्राणी शुद्धा जास्त प्रमाणात इकडे तिकडे फिरत असतात, तरी या सर्व समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पथदिव्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर गावातील पथदिवे सुरू करावे आणि गावातील जनतेला अंधारापासून मुक्त करावे असे सुद्धा गावातील जनतेतून बोलले जात आहे.