आरक्षणासाठी! दोन कार्यकर्ते चढले ‘बीएसएनएल’च्या टॉवरवर

0
8

बुलढाणा : कोळी समाजाला महादेव कोळीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज, मंगळवारी दोन कार्यकर्ते येथील ‘बीएसएनएल’च्या टॉवरवर चढले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.आरक्षणाच्या मागणीसाठी शासन व प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन व विविध आंदोलने केली. मात्र, शासन व प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. भारतीय दूरसंचार निगमच्या मनोऱ्यावर पलढग येथील गंगाधर तायडे व बोथा फॉरेस्ट येथील निलेश गवळी हे चढले. त्यांची समजूत घालण्यासाठी ‘बीएसएनएल’चे दोन कर्मचारीसुद्धा टॉवरवर चढले. मात्र, त्यांनी कर्मचाऱ्यांना जुमानले नाही. बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे, बुलढाणा शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर व काही नेत्यांनी समजूत घातल्यावर अखेर ते खाली उतरले.