एस.एस.जे.महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
8

अर्जुनी मोर.–कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर गोंदिया आणि शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जायस्वाल महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 9.1.2024 रोज मंगळवार ला आयोजित करण्यात आला
संस्था अध्यक्ष लूणकरण चितलांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संस्था सचिव मुकेश जायस्‍वाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले , आयक्यूएसी समन्वयक डॉ. के. जे. सीबी आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर गोंदिया चे सहाय्यक आयुक्त राजू नानाजी माटे तसेच सी सीपीसी चे समन्वयक डॉ. डी. एल. चौधरी मंचकावर उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त राजू माटे यांनी रोजगार मेळावा आयोजन करणे मागीलआपली भूमिका विशद करीत सांगितले की उद्योजक आणि बेरोजगार यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याकरिता रोजगार मेळावा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. तसेच बेरोजगारांकरिता शासन दरबारी असलेल्या विविध ट्रेनिंग कार्यक्रम आणि विविध योजना यांची माहिती या निमित्ताने उपस्थितांना दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहुर्ले यांनी आजच्या काळात फक्त शिक्षण घेणे पुरेसे नाही तर त्यासोबतच कौशल्य आत्मसात करणे अति आवश्यक आहे . आपल्या महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध कौशल्य विकास कार्यक्रम कोर्सेस इत्यादी बाबत माहिती देत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.विविध कंपनीतील प्रतिनिधींनी आपल्या कंपनी बाबत थोडक्यात माहिती यावेळी उपस्थित उमेदवारांना दिली.
या मेळाव्याला अनेकविध कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एस बीआय लाइफ इन्शुरन्स गोंदिया , संसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गोंदिया , सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी गोंदिया ,कॅप्सटॉन सर्विसेस लिमिटेड हैदराबाद ,पटले एजूस्कील फाउंडेशन नागपूर,क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नागपूर आणि ॲक्सिस टाईम प्रो या कंपनीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्याला 208 उमेदवारांनी नाव नोंदणी केली. आणि 111 उमेदवारां ची मुलाखती नंतर प्राथमिक निवड करण्यात आली. तसेच दहा उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन सी सी पी सी चे समन्वयक डॉ चौधरी यांनी केले तर समिती सदस्य प्रा यात्रिक भगत यांनी आभार प्रदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेंद्र डोंगरे, संदीप टेंभुर्णेकर, समन्वयक जिल्हा कौशल्य विकास समन्वयक अनिकेत हंबर्डे, वरिष्ठ लिपिक मोहम्मद निसार, वरिष्ठ लिपिक जे पी लिल्लारे शिपाई तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.