शिक्षक कैलास हांडगे यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल गौरव

0
15

अर्जुनी मोर.:-तालुक्यातील ग्राम इंजोरी येथे स्व.चत्रुजी भेंडारकर यांचे स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात
तालुक्यातील ग्राम सुकळी येथील शिक्षक कैलास हांडगे यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शिक्षक कैलास हांडगे यांनी परिसरातील अनाथ व आजारी जि प शाळेतील मुलांसाठी दानशूर प्राथमिक शिक्षक व समाजाघटकाकडून भरघोस देणगी गोळा करण्यासाठी पुढाकार घेऊन मायेची फुंकर मारली. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ग्राहक पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक मताने निवडून येण्याचा मान मिळवून पतसंस्थेच्या कोहमारा शाखेच्या शाखाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व अनेक सामाजिक,संघटनात्मक व शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षक कैलास हांडगे यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद गटनेते व जि प सदस्य लायकराम भेंडारकर यांनी स्व.चत्रुजी भेंडारकर यांच्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले होते.यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हा परिषद गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, शुभांगी सुनील मेंढे, सभापती सविता कोडापे, जि प सदस्य जयश्री देशमुख, पोर्णिमा ढेंगे, कविता रंगारी पंचायत सदस्य संदीप कापगते, डॉ.नाजूक कुंभरे, कुंदाताई लोगडे, विजय कापगते, रत्नदीप दहिवले, डॉ.गजानन डोंगरवार, शारदा नाकाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपंकर ऊके यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता लंजे व लाखेश्वर लंजे तथा आभार विठोबा रोकडे यांनी मानले.