32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाला प्राधान्य:- लायकराम भेंडारकर

तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाला प्राधान्य:- लायकराम भेंडारकर

0
31

blank

अर्जुनी मोर. – तालुक्यातील बोंडगाव देवी हा परिसर पर्यटन व तिर्थक्षेत्र परिसर म्हणुन ओळखले जाते. बोंडगावदेवी येथे गंगा जमुना माता चे मोठे धार्मिक तिर्थस्थान असुन याच परिसरात संतनगरी इंजोरी,चान्ना जवळ दोन नाल्यांचा संगम आहे. दरवर्षीच येथे मकरसंक्रांतीच्या पर्वावर यात्रा भरते, तसेच परिसरातील नागरीक येथे अस्थीविसर्जन सुध्दा करतात.त्यामुळे या परिसराला धार्मिक स्वरुप प्राप्त झाले आहे. या विभागाचा जि.प.सदस्य म्हणुन या तिर्थस्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन लायकराम भेंडारकर यांनी केले आहे. चान्ना इंजोरी-पंचवटी रस्त्यावर ३०५४ योजनेंतर्गत १० लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आले. त्या बांधकामाचे भूमिपूजन( ता. ८ ) लायकराम भेंडारकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संदिप कापगते, कुंदाबाई लोगडे, सरपंच सचिन डोंगरे, पोलीस पाटील नेमिचंद मेश्राम, लक्ष्मण भेंडारकर, भागवत लंजे, तुमदेव डोंगरवार, मुकेश तरोणे व ईतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

blank