पौष्टिक तृणधान्यांचे मानवी आहारातील महत्त्व बाबत जनजागृती रॅलीचे आयोजन

0
6

गोंदिया, दि.14 :  13 जानेवारी 2024 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तुणधान्य वर्ष जिल्हा कृषी व महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, महिला विकास आर्थिक महामंडळ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  पौष्टिक तृणधान्य व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने शासकीय विश्रामगृह ते मोदी मैदान या मार्गावर रोड शो रॅली आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीमध्ये कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी, विद्यार्थी, व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

          यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी सदर रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कृषी उपसंचालक धनराज तुमडाम, उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, कृषी अधिकारी पवन मेश्राम, तालुका कृषी अधिकारी गोंदिया राजेश पवार, तालुका कृषी अधिकारी गोरेगाव सुलक्षणा पाटोळे, तालुका कृषी अधिकारी तिरोडा गजानन चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अर्जुनी/मोर. रवींद्र लांजेवार, तालुका कृषी अधिकारी सडक अर्जुनी लिलाधर पाठक, तालुका कृषी अधिकारी आमगाव महेंद्र दिहारे उपस्थित होते.