माजी पालकमंत्री डॉ.फुके यांच्या हस्ते गोंदियात विविध विकास कामांचा भूमिपूजन

0
14

गोंदिया. 24 जाने.-21 जानेवारी रोजी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते गोंदिया शहरात सुमारे 3 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले व अनेक समाज बांधवांची भेट घेतली.

श्री फुके यांनी पिंडकेपार मंदिर संकुलातील रस्त्याचे भूमीपूजन, कोसरे कलार समाज भवनाचे भूमिपूजन, अखिल भारतीय धोबी समाज गोंदियाच्या समाज भवनाचे भूमीपूजन, प्रभाग 10 मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन, रामनगर येथील शिवमंदिर जीर्णोद्धार भूमिपजन यासह अनेक विकासकामाच्या भूमिपजन करण्यात आली.

या भूमिपजन कार्यक्रमादरम्यान माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगितले. गरज भासल्यास आणखी निधी आणून वचनबद्धतेने काम पूर्ण करून या साठी आश्वस्त केला.

श्री.फुके म्हणाले, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार विकासाच्या दृष्टीकोनातून आणि सर्वांच्या हिताच्या जोरावर बहुआयामी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील नेतृत्वाखाली संपूर्ण देश विकासाकडे वाटचाल करत आहे.

ते म्हणाले, हे काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ आहे. आपल्या पूर्वजांना जे दिसत नव्हते ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत हे आपले सौभाग्य आहे. भगवान श्रीराम त्यांच्या जन्मभूमी अयोध्येत विराजमान आहेत. त्यांच्या जीवन समर्पणाचा हा अविस्मरणीय दिवस आम्हाला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे हे अभिमानास्पद आहे.

या विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमा दरम्यान आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार कुथे, शिव शर्मा, कु. नेहाताई नायक, अनिल बिसेन, ओम कटरे, देवेश मिश्रा, अमित झा, सुधीर कायरकर, दाराभाऊ बैरिसाल, कु. मैथुलाताई बिसेन, बाबाभैय्या बिसेन, नरेंद्र तुरकर, मौसमी परिहार, अशोक पाथोडे, शैलेंद्र मिश्रा, श्यामचंद्र येरपुडे, दुलेश मिश्रा, रवी मुदंडा, भाऊराव उके, धनराज ओक, नरेंद्र धुवारे, सर्वेश्वर मेश्राम, कु. सरोस्ताताई मेश्राम, मुलचंद फुरकुंडे, राजेंद्र कावळे, श्रीकांत उके, प्रवीण पटले, कु. दिपालीताई कनोजिया, मनीष कनोजिया, चंद्रकिशोर चौधरी, राजकुमार कनोजिया, गुड्डू मिश्रा, श्याम कनोजिया, श्री मैत्रे गुरुजी, स्नेहल पटेल, बुद्धिप्रकाश गुप्ता यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.