भंडारा: दि.२5 : आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या भंडारा जिल्हा अध्यक्ष पदी डॉ.महेंद्र निमजे यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. हि नियुक्ती महाराष्ट्र राज्य सचिव डॉ.विनोद देशमुख व राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ शाहिन मुलाणी, राष्ट्रीय सचिव डॉ.आनंद भोसले, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.विश्वास वाघमारे, राष्ट्रीय नॅचरोपॅथी सचिव डॉ.जलिल शेख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.सुतार मॅडम, राष्ट्रीय अध्यक्ष अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉ.सुतार सर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.नवले, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मनीषा गुरव, राष्ट्रीय कायदे प्रसिद्धी अध्यक्ष डॉ.गणेश पाटील सर. डॉ.फैयाज शेख, डॉ. तन्वीर देशमुख, डॉ. नामदेव मोरे, डॉ. राजेंद्रकुमार नवले, डॉ.स्वाती राजे मॅडम, डॉ.फैजान इनामदार, डॉ.शाहिन मुलाणी, डॉ.सेंड्रा डिसोझा मॅडम, डॉ.शब्बीर पठाण, डॉ.फिरोज पठाण, तसेच राष्ट्रीय विधी सल्लागार कमिटी, राष्ट्रीय पद नियुक्ती समिती, राष्ट्रीय ॲक्शन फोर कमिटी तसेच सर्व कमिटीच्या सहमतीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत डॉक्टर असोसिएशन / संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे.
तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे.