जिल्हा न्यायालय येथे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’’निमित्त कायदेविषयक जनजागृती

0
34

गोंदिया, दि. 25 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया व जिल्हा वकिल संघ, गोंदिया मार्फत 14 जानेवारी 2024 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त नुकताच कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

          सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ए. टी. वानखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन एन. डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश – 2, एस. व्ही. पिंपळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अॅड. एम. एस. चांदवानी, जिल्हा सरकारी अभियोक्ता, गोंदिया व अॅड. श्रीमती आरती भगत उपाध्यक्ष, जिल्हा वकील संघ हे उपस्थित होते.  कार्यक्रमाला लाभलेले तज्ञ मार्गदर्शक प्रा. लोकेश कटरे, मराठी भाषा विभाग, नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया तसेच सर्व न्यायीक अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचारी वृंद व सर्व वकील वर्ग सदर कार्यक्रमात उपस्थित होते.

         प्रा.कटरे यांनी आपल्या संभाषनामध्ये मराठी भाषेचे अनन्य महत्व व मराठी भाषेची गोळी विषयी  मागदर्शन केले. तसेच ए. टी. वानखेडे यांनी अध्यक्षीय संभाषणामध्ये मराठी भाषेचे न्यायालयीन क्षेत्रात महत्व व न्यायालयीन कामकाजात मराठी भाषाचे वापर व्हायला हवे तसेच मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळायला  हवा ही अपेक्षा बाळगली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. सुजाता तिवारी व आभार एड. अतुल येडे यांनी केले.