साजरी भीमजयंती करू -तिरपुडे यांची ग्वाही

0
8

जयंतीच्या अध्यक्ष पदाची लोकशाही पद्धतीने निवड

गोंदिया ता.27 जानेवारी :-डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदासाठी सभेचे आयोजन करण्यात येऊन, अखेर जयभीम चिट्ठीने गेंदलाल तिरपुडे यांची निवड करण्यात आली आहे. श्री तिरपुडे हे येथील पांडे ले-आऊट चे रहिवाशी असून ते गोंदिया जिल्हा परिषदेत लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते.प्रचार माध्यमाशी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष तिरपुडे यांनी,डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी थाटामाटात करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितलं.
येथील अशोक कांबळे यांच्या निवासस्थानी आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी GDCC बँकेचे सेवानिवृत्त महा व्यवस्थापक आयु. विलास वासनिक हे होते.ही निवड अत्यंत चुरशीची ठरली. अध्यक्ष पदासाठी एकूण 6 कार्यकर्ते रिंगणात होते. यामध्ये गेंदलाल तिरपुडे, अनंत टेम्भूर्णीकर, एन. एल. मेश्राम, डॉ मनोज राऊत, स्वातीताई वालदे, नूरलाल उके यांचा समावेश होता. पैकी चौघाणी आपली उमेदवारी मागे घेतली असून रिंगणातील श्री तिरपुडे आणि श्री टेम्भूर्णीकर यांच्यात जोरदार लढत झाली. कुणीही मागे हटण्यास तय्यार नसल्याने अखेर जयभीम चिट्ठीने निवड करण्यात येऊन श्री तिरपुडे हे येशस्वी ठरले.
दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले व फटाक्याच्या लडया फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.तत्पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंतीचे मावळते अध्यक्ष आयु. नानाजी शेंडे आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे मावळते अध्यक्ष आयु.अक्षय वासनिक यांनी मागील जयंतीचा जमाखर्च सादर केला, तो ध्वनी मताने मंजूर करण्यात आला.दरम्यान आयु. निलेश अशोक कांबळे आणि स्वातीताई वालदे यांना त्यांच्या जन्म दिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठया संख्येने समाज बंधू भगिनी उपस्थित होते.सुनील मेश्राम यांनी संचालन केले तर अरविंद साखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.