चिचगड तलाठी दंडाळेना हटविण्याची मागणी,अप्पर तहसीलदाराला दिले निवेदन

0
43

चिचगड-येथील तलाठी नितिलेश दंडाळे हे तीन ते चार महिन्यापासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यांना लागणारे सात बारा व ८(अ)हे कागदपत्रे न मिळाल्याने आता शेतीच्या हंगामात शेतमाल विक्रीसाठी सातबारा शिवाय सोसायटीला माल विकता येत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाराला माल द्यावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.ह्या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न आज जनतेने अधिकाऱ्याला विचारला.यापूर्वी चिचगडला प्रकाश चव्हाण हे तलाठी होते त्यांची बदली झाल्यानंतर दंडाळे हे तलाठी चिचगडला आले.आता दंडाळे यांच्या त्रासामुळे नागरिकांनी प्रकाश चव्हाण हे तलाठी आता सध्या बीजेपार येथे आहेत त्यांना पुन्हा चिचगडला परत आणावा अशी मागणी अप्पर तहसीलदार सौ.डेकाटे यांच्याकडे निवेदनातून परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.हे निवेदन सामाजिक कार्यकर्ता अनिल घोटे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. यावेळी सावंत बापू राऊत, भाऊदास बिझंलेकर, मनोज चौधरी, प्रेमलाल चावर,अनिल घोटे,भीमराज तुरकर, पुनऊ मरई ,मकबुल शेख, शेख सब्बीर ,दशरथ मरई, नारद नाईक, पुनारद कुंजाम ,आणि असे अनेक परिसरातील नागरिक निवेदन देतेवेळी उपस्थित होते.