जिल्हा परिषद अध्यक्ष रहांगडालेंच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया -जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते मोहगाव बुद्रुक येथे २० लक्ष रू. (एमआरजीएस) अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन परिसरातील गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी विधीवत भूमीपूजन करुन लवकरात लवकर निर्माण कार्य पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्यापासून  जिल्ह्यातील प्रत्येक गावात सर्वांगीण विकास साधण्याच्या प्रामाणिक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले तसेच मोहगाव बुद्रुक येथे या आधी केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. दरम्यान प्रमुख्याने मनोज बोपचे सभापती पंचायत स. गोरेगांव, ओमप्रकाश कटरे प. स. सदस्य, ज्योतिकाताई कुमरे सरपंच, कमलेश रहांगडाले उपसरपंच, गणराज पटले तंटामुक्ती अध्यक्ष, हुमराज बावनकर, रेखलालजी पटले, दीनदयालजी रहांगडाले तसेच ग्राम पंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित होते.