भंडारा शहरालगत जवाहरनगर आयुध निर्माणीत भीषण स्फोट, एक ठार

0
8

भंडारा 0शहरालगत जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 08.30 वाजता. झालेल्या दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला. स्फोट इतका भीषण होता की त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे. मृतकाचे नाव अविनाश मेश्राम आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामाला आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू होते. त्यांनी काम सुरू केल्यानंतर अडीच तासात ही घटना घडली. स्फोट होताच ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अफरातफर उडाली.लगेच आग विझवण्यासाठी फॅक्टरीचे अग्नीशमन दल सरसावले आणि लगेच आग आटोक्यात आणली. पण कर्मचारी दहशतीमध्ये आले आहेत. यापूर्वी भंडारा शहरालग असलेल्या सनफ्लॅग कंपनीतली स्फोटाची घटना घडली होती. त्यामध्ये तीम कर्मचारी भाजले होते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्पोठाची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे शहरवासीसुद्धा दहशतीखाली आले आहेत.