ग्राहक किंमती निर्देशांक अंतर्गत माहिती देणाऱ्या आस्थापनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

0
20

 गोंदिया, दि.1 : अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून राज्यातील ग्रामीण व नागरी विभागाकरीता स्वतंत्रपणे ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यात येतो. गोंदिया जिल्हास्तरावरील ग्राहक किंमती निर्देशांक तयार करण्याकरिता सहा केंद्र भावसंकलन करण्याकरीता निवडण्यात आलेली आहेत. यामध्ये तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील मे. आझाद किराणा ॲन्ड जनरल स्टोर्स, तिरोडा येथील मे. अवसरे किराणा भांडार, नवेगावबांध येथील मे. साईकृपा प्रोव्हिजन, गोंदिया येथील मे. बोरकर गुरुजी किराणा स्टोर्स, कामठा येथील मे. जय भवानी किराणा स्टोर्स तसेच ठाणा येथील मे. राजेश किराणा ॲन्ड जनरल स्टोर्स या आस्थापनांचा समावेश आहे.

        जिल्हा सांख्यिकी कार्यालय गोंदिया भावसंकलकांच्या माध्यमातून वरील दुकानातून वस्तूंच्या किंमती संकलीत करुन राज्य तसेच केंद्र स्तरावर ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यासाठी पाठवित असते. ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यासाठी वरील आस्थापनांचे सहकार्य मोलाचे ठरत असून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या आस्थापनांचे मालक हुकुमचंद असाटी वडेगाव, विशाल अवसरे तिरोडा, हरीश भैय्या नवेगावबांध, राजु बोरकर गोंदिया, विजय अग्रवाल कामठा व राजेश भेलावे ठाणा यांना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.