देशाला संविधान समजणारा युवकाची आज गरज आहे – डॉ के. जे. सीबी

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.02– शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोर. च्या रासेयो विभागातर्फे माहुरकुडा येथे ‘विकसित युवा विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे चौथे दिवस दि. 31 जाने. 2024 च्या बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राकरिता अध्यक्ष म्हणून श्री भागवतजी नाकाडे तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. भारत राठोड राज्यशास्त्र विभाग प्रमूख एस.एस जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोरगाव व डॉ. के. जे. सीबी आयक्यूएसी समन्वयक एस एस जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी /मोरगाव, डॉ . एम आर दर्वे शिबीर प्रमूख व रासेयो कार्यक्रम अधिकारी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी बौद्धिक सत्र आयोजनाची भूमिका प्रास्ताविकातून शिबिर प्रमुख डॉ. एम. आर. दर्वे यांनी मांडली. या सत्राचे मार्गदर्शन डॉ सीबी यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले तसेच डॉ. भारत राठोड यांनी ‘भारतीय लोकशाहीची ७५ वर्षे’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन स्नेहल ब्राह्मणकर व आभार यांनी मानले. याप्रसंगी संपुर्ण शिबिरार्थी व घनेश्वरी वघारे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीेतेकरिता करिता रासेयो शिबिरार्थ्यानी परिश्रम घेतले.