पोलीस उपायुक्तांने हिसकावला महिला पत्रकाराचा कॅमेरा

0
8

नागपूर,दि.13-नागपूर शहरातील जरीपटका येथे काल रविवारला घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर आज पोलिसांच्या निषेधार्थ संतप्त जमावाने केलेली जाळपोळ, दगडफेक केली.या दरम्यान पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, हे सर्व होत असताना पत्रकार,छायाचित्रकार हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते.एवढ्यातच पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसच्या महिला छायाचित्रकार मोनिका चतुर्वेदी यांच्याशी बाचाबाची करीत त्यांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला.तसेच वादही घातला.या प्रकरणामुळे नागपूरातील सर्व पत्रकारांनी वरिष्ठाकडे झालेल्या प्रकाराबद्ल निषेध नोंदविला असून अविनाश कुमार यांची तक्रार मुख्यमंत्र्यापर्यत करण्याचा निर्मय नागपूर पत्रकार संघाने घेतला आहे.