ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे सडक अर्जुनीत स्वागत 

0
8

सडक अर्जुनी ः जातीनिहाय जनगणना/ सर्वेक्षण करावे, या मागणीसाठी निघालेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे सडक अर्जुनी तालुक्यात बुधवारला(दि.7) जोरदार स्वागत करण्यात आले.ओबीसी जनगणना झाली तर समाजाच्या विकासाची दारे उघडतील,समाजाकरीता स्वतंत्र निधीची तरतूद होईल याकरीता आपण सर्वांनी जनगणनेकरीता दबाव घालावा असे आवाहन यात्रेचे संयोजक उमेश कोर्राम यांनी केले.त्यापुर्वी सडक अर्जुनी येथील जुुना बसस्थानक परिसरात यात्रेचे स्वागत करुन पदयात्रा काढण्यात आली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्नर सभा घेण्यात आली.यावेळी राज्यसरकारने 2019पासून ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतीगृह मंजूर केले.मात्र अद्यापही सुरु केलेले नाही.सरकारने यापुर्वी 5 वेळा तारखा दिल्या तरीही वसतीगृह सुरु न झाल्याने आपल्या गोरगरीब ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकावर भुर्दंड बसत असल्याची टिका कोर्राम यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. मात्र, ओबीसी आणि इतर समुदायातील जातींचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने परवानगी दिली नाही. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर सर्व जातींचासुद्धा समावेश करावा,तसेच सारथीमधून ओबीसी कुणबी समााजाला वगळण्यात यावे,कुुणबी समाजाचे प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात येऊ नये यावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, अशोक लंजे, ओबीसी संघर्ष समिती तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे,माधव तरोणे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,भुमेश ठाकरे,आर.आर.अगडे,पुष्पाताई खोटेले,देवचंद तरोणे,अविनाश काशीवार,मधुसुदन दोनोडे,गिरधारी हत्तिमारे ,निशांत राऊत,राजू पटले,रोशन बडोले,रमेश लांजेवार, भूमेश्वर शेंडे,अनिल बावणे,किरण हटवार,,किशोर शेंडे,तुलाराम येरणे,तुकाराम राणे,जागेश्वर पाथोडे,श्री.मते,श्री.काशीवार,डी.आय.कटरे,देवेंद्र तुरकर,एफ.आर.टी.शहा,श्री.वंजारी,श्री.गिर्हेपुंजे ईश्वर कोरे उपस्थित होते.विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते़.