राजाभोज महारॅलीचे आयोजन १४ रोजी

0
20

समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
गोंदिया : क्षत्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. या निमित्ताने समाजात एकता निर्माण व्हावी, त्या अनुसंगाने जिल्हास्तरीय क्षत्रिय राजाभोज महारॅलीचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी गोंदिया शहरात करण्यात आले आहे.
महारॅलीचे विधीवत उद्घाटन सकाळी ११ वाजता स्थानिक जयस्तंभ चौक येथे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहउद्घाटक कैलाशचंद्र हरीणखेडे तर विशेष अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, जि.प.सभापती संजयसिंह टेंभरे, माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आमदार हेमंत पटले, खोमेश्वर रहांगडाले, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले,पवार प्रगतीशील मंच अध्यक्ष अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,राष्ट्रीय पवार महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे,माजी जि.प.सभापती पी.जी.कटरे,माजी सभापती झामसिंग बघेले, संजय रहांगडाले,पवार प्रगतीशिल शिक्षण संस्था अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, पुरूषोत्तम कटरे, रमेश अंबुले, धनंजय तुरकर, नंदुभाऊ बिसेन, राजेश चव्हाण, प्रा.एच.एच.पारधी, सौ.धनिषा कटरे, रजत गौतम, डॉ.प्रशांत कटरे यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही रॅली जयस्तंभ चौक येथे सुरू होवून गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक व नेहरू चौक येथे रॅलीचे समापन होणार आहे. तरी जिल्हास्तरीय या महारॅलीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महारॅली उत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार (पप्पु) पटले, पप्पू टेभंरे, उमेश पारधी, विक्की बघेले, प्रवेश बिसेन, दिनेश तुरकर, दीप्ति पटले, दुर्गाप्रसाद ठाकरे, संतोष पटले, दीपम देशमुख, बाबा बिसेन, पंकज पटेल, प्रवीण (बिट्टू) बिसेन, तिजेश गौतम, सचिन बोपचे, राहुल बिसेन, शोहिल कटरे, सहसचिव छत्रपाल चौधरी, ओमप्रकाश हरीणखेडे, संदीप तुरकर, शैलेश तुरकर, मुकेश पटले, गौरव हरीनखेड़े, दिनेश रहांगडाले, इंद्रकला ओमप्रकाश पारधी, सुरेश पटले, अजय रहांगडाले, ओमेश्वर (बाबा) चौधरी, बंटी बोपचे, ओमप्रकाश पारधी, मोनु रहागंडाले, अजय रहागंडाले, प्रवीण अंबुले, योगेश रहागंडाले, रोहित कटरे, चुनेश पटले, ओम रहांगडाले, पंकज चौधरी, रवि रिनायत, आशीष कटरे व नितिन कोल्हे यांनी केले आहे.