लोककलेमधून संस्कृतीचे दर्शन होते-आमदार अग्रवाल

0
27

‘महासंस्कृती’* महोत्सवाचे थाटात उदघाटन

गोंदिया:- सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे पाच दिवशीय “महासंस्कृती महोत्सव” चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उदघाटन आज गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.य़ावेळी मंचावर जिल्हाधिकारी प्रजित नायर ,पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरगंथन,निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे,गोंदियाच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तिरोडा उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड,अप्पर तहसिलदार विशाल सोनवणे, तहसिलदार समशेर पटाण,टाईम्स गृपचे साई डोमा आदी मंचावर उपस्थित होते.

उदघाटक म्हणून बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, सास्कृतिक विभागाला नवी ओळख मिळाली असून लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याकरीता अशा कार्यक्रमाचे महत्व आहे.ज्या काळात प्रचार प्रसाराची साधणे नव्हती तेव्हा लोककलेच्या विविध माध्यमातून संदेश गावागावापर्यंत पोचले जायचे.त्या कलेचा वापर संस्कृतीच्या माध्यमातून ओळख पटवून देण्याकरीता चांगले कार्य आहे.

राज्यातील संस्कृतीचे आदान प्रदान या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे.नामांकित कलाकार आपल्या कलेतून जिल्ह्यातील कलेचा कलावंत सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले.संचालन भैरवी देशपांडे व राजन चौबे यांनी केले. आभार अप्पर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.या महोत्सवात आज १२ फेब्रुवारीला जागर लोककलेचा या सदरात दंडार, भारुड, गोंधळ, वासुदेव व आदिवासी नृत्य. प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा पोवाडा सादर करण्यात आले.महिला आर्थिक विकास महामंडळाच्यातीने महासंस्कृती कार्यक्रम परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेत.जवळपास ३० च्या वर स्टॉल असून खाद्यपदार्थासह साहित्याचे स्टॉल आहेत.

आज मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी कवी-हास्य संमेलनात प्रसिद्ध विनोदवीर सुनील पॉल, एहसान कुरेशी, राजीव निगम व प्रसिद्ध वऱ्हाडी कवी मिरझा रफी बेग सहभागी होणार आहेत. यासोबतच मेधा घाडगे व सहकलाकार सांस्कृतिक लावणी सादर करतील.