माजी मंत्री बडोले यांची जिल्हाधिकार्‍याशी विविध विषयांवर चर्चा

0
6

अर्जुनी मोर :– माजी सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व विविध विषयावर चर्चा केली.त्यात प्रामुख्याने वनहक्क जमिनीचे पट्टे देण्यासंदर्भात होत असलेली दिरंगाई तसेच अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकरी प्रोत्साहन राशी मिळण्यापासुन वंचित आहेत .ही बाब जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.तसेच अन्य विषयावरही चर्चा करुन गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांना भेडसावणा-या समस्या अवगत करुन प्राधान्यक्रमाने सोडविण्यात याव्यात.असेही निदर्शनास आणून दिले.
यावेळी त्यांच्यासोबत जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे, गोरेगाव पं.स.सभापती मनोज बोपचे, जि.प.सदस्य कविता रंगारी, डॉ.भुमेश्वर पटले,सडक अर्जुनी पं.स.उपसभापती शालिंदर कापगते, माजी जि.प.सभापती विश्वजीत डोंगरे, माजी जि.प.सदस्य रामदास कोहळकर, पं.स.सदस्य रामेश्वर मारवाडे, सुरेंद्रकुमार ठवरे आदि उपस्थित होते.