सौ.वर्षा पटेल व प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम साजरा

0
10

अर्जुनी मोर. -खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षा पटेल यांचे वाढदिवस 16 व 17 फेब्रुवारीला संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यात साजरा केल्या जातो. गोंदिया जिल्हा ओबीसी सेल चे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी यावर्षी प्रफुल पटेल व वर्षा पटेल यांचा वाढदिवस बोंडगाव देवी येथील गंगा जमुना माता मंदिरात अभिषेक करून दीर्घायुष्याकरिता आशीर्वाद घेतले. व बोंडगाव देवी येथील गरजू गरीब लोकांना ब्लॅंकेट चे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला .
16 फरवरी सौ वर्षा पटेल यांचा वाढदिवस व उद्या प्रफुल पटेल यांचा वाढदिवस निमित्त सर्वप्रथम केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदिया जिल्हा ओबीसी सेलकडून जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी बोंडगाव देवी येथे गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप चे कार्यक्रम आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता नारायण भेंडारकर,राष्टवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, यादवराव पाटील तरोणे ,भुगाव येथील सेवा सहकारी चे उपाध्यक्ष पतीराम मेश्राम,लक्ष्मी भात गिरणिचे अध्यक्ष भोजराम राहिले, पत्रकार अमर ठवरे, रवी बनपूरकर, केशव मेश्राम, संजय गिरीपुंजे, माणिक मेश्राम, मुकुंदा मानकर, हेमराज मानकर, ओम बनपुरकर, कैलास घावळे,व अन्य कार्यकर्ते व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.