विदर्भस्तरीय ओबीसी संघटनांची 19 जून रोज रविवारला नागपूरात बैठक

0
10

नागपूर-ओबीसी समाज आरक्षण,शिष्यवृत्ती,क्रिमिलेयरसह शासनाने अद्याप न काढलेले फ्रीशीपचे शासन निर्णय यासह इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोबतच विदर्भात ओबीसीचे संघटन बळकट करण्यासाठी विदर्भस्तरीय ओबीसी संघटनेचे गठण करण्याच्या उद्देशाने नागपूर येथे विदर्भस्तरीय सर्व ओबीसी संघटनाची बैठक सकाळी 11 वाजता धनवटे नॅशनल कॉलेज ,अजनी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकिला विदर्भातील सर्वच ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,समाज संघटनाप्रमुख,लोकप्रतिनिधी,अधिकारी ,कर्मचारी व विद्याथ्र्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1)ओबीसीची जनगणना करण्यात यावी
2)ओबीसींना क्रिमिलेयरची असैवंधानिक लादलेली अट रद्द करुन एससीएसटी प्रमाणे सवलत देण्यात यावी.ॉ
3)ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी
4)केंद्राच्या 100 टक्के शिष्यवृत्ती योजनेची अमलबजावणी करण्यात यावी
5)ओबीसींना शिक्षणासोबतच नोकरीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे
6)ओबीसींच्या विद्यार्थ्यासांठी एमपीएससी व युपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे
7)ओबीसीची विदर्भस्तरीय कार्यकारीणी गठित करणे
या विषयावर या बैठकित चर्चा करण्यात येणार आहे.ओबीसी समाजातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी व चळवळीतील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर कृती समितीचे सयोंजक सचिन राजुरकर,बबनराव फंड,,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे खेमेंद्र कटरे, अमर वराडे,बबलू कटरे,मनोज मेंढे,ओबीसी सेवा संघाचे बी.एम.करमरकर,कृपाल लांजेवार,महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ संघटक प्रा.दिवाकर गमे,गडचिरोली ओबीसी अधिकारी,कर्मचारी फेडरेशनचे प्रा.शेषराव येलेकर,रमेश मडावी,राष्ट्रीय ओबीसी संघटने संघटना नागपुरचे पांडुरंग काकडे,प्रा.शरद वानखेडे,गोविंद वरवाडे,राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोच्र्याचे सयोजक नितीन चौधरी बहुजन संघर्ष समिती,ओबीसी एकता मंच आदी संघटनांनी केले आहे.