जिल्हा परिषदेत संत गाडगे महाराज यांना अभिवादन

0
5

गोंदिया – जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी विधिवत पूजन करून संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केले.
यावेळी साहित्यिक वृध्द कलावंत समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच जीवनलाल लंजे उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहायक यज्ञेश मानापुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्विय सहायक सुभाष खत्री, शिक्षण विभागाचे अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे भागचंद रहांगडाले, सामान्य प्रशासन विभागाचे वैद्य यांच्यासह जिल्हा परिषदेतील इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.