गोंदिया,दि.01-सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. कनेरी येथे आदिवासी शबरी वित्त विकास महामंडळ व संस्थेच्या भागीदारीतून नवनिर्मित गोदाम बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी गंगाधर परशुरामकर, डॉ अविनाश काशिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी बोलतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याकरिता अग्रेसर असून जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका 25 टक्के व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 75 टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते, हे कर्ज 0 टक्के व्याज दराने मिळत असल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरणा करावा त्यामुळे कर्ज नूतनीकरण करण्यात सोयीचे होईल.
यावेळी सर्वश्री शिवाजी गहाणे, सपना नाईक, मंजू चंद्रिकापुरे, ईश्वर कोरे, वसंत गहाणे, रंजना नाईक, प्रकाश वैद्य, दिलिप मेंढे, तुलाराम घरत, हिरामण वखारे, चोपराम कुरसुंगे, काशिनाथ राणे, आकोजी रहेले, अमरदिप रोकडे सहीत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.