वाघाचे हल्लयात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

0
10

पवनी : तालुक्यातील परसोडी (खापरी) व गुडेगाव येथे वाघाचे हल्लयात ठार झालेल्या इसमांच्या कुटुंबीयांना खासदार नाना पटोले यांच्या हस्ते परसोडी खापरी येथे धनादेश वितरित करण्यात आले.
याप्रसंगी नाना पटोले यांनी नरभक्षक वाघाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करण्यात येईल. उमरेड-कर्‍हांडला-पवनी अभयारण्यातील गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे आश्‍वासन दिले, सरकारने इंग्रजाचे काळातील कायदे बदलले असल्याने प्रकल्पबाधित गावातील जनतेला जास्तीत जासत मोबदला मिळत असल्याचे सांगितले. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांनी लाठय़ाकाठय़ा हातात घेऊन समूहाने शेतावर जावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार अँड. रामचंद्र अवसरे, जि.प. समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम, माजी सभापती हंसा खोब्रागडे, तहसीलदार वासनिक, पं.स. सदस्य मनोहर आकरे, जिल्हा वनक्षेत्राधिकारी (वन्यजीव) भलावी, वनपरिक्षेत्राधिकारी डी. एम. बारई, खापरीच्या सरंपच रेखा रेहपाडे, चिचखेडाच्या सरपंच कुंदा तलमले, भाजपाचे कार्यकर्ते राजेंद्र फुलबांधे, हरीश तलमले, डॉ. संदीप खंगार, राजेश येलशेट्टीवार, सुरेश अवसरे, विवेक अवचट, के. डी. मोटघरे यावेळी उपस्थित होते. मृतक रुपचंद माटे यांच्या पत्नी मनीषा रुपचंद माटे यांना ९0 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. घटनेच्या दिवशी १0 हजार रुपये तातडीची मदत देण्यात आलेली होती. उर्वरित रक्कम ७ लाख रुपये मुदत ठेवीच्या स्वरुपात देण्यात येणार आहे.