जनतेची विश्वासहर्ता कायम राखणार:-राजकुमार बडोले

0
14

 आठ गावात ४१ लक्ष निधीच्या विकासकामांचे भूमीपूजन
*अर्जुनी मोर-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र आपली कर्मभुमी आहे. क्षेत्रातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचविली.अनेकांच्या अडीअडचणी सोडविल्या. त्यामुळे जनतेचा आपल्यावर अतूट विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.जनतेची अविरत सेवा करण्याचा संकल्प केला आहे. आठ गावासाठी ४१ लक्ष रुपये निधीतुन विकास कामांचे भूमीपूजन होत आहे.आपण पदावर किंवा सत्तेत असो वा नसो आपण विकास कामे करीतच राहु,आणि अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील जनतेची विश्वासहर्ता कायम ठेवु असा आत्मविश्वास माजी मंत्री ईंजी राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे.
अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत येणा-या डोंगरगाव/ खजरी, गुढरी, सोमलपुर, रामपुरी, तिडका, धाबेटेकडी, येरंडी /दर्रे व कान्होली या आठ गावातील ४१ लक्ष निधीच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी( ता. ६ )बोलत होते. यावेळी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोळेे, सडक अर्जुनी पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्य डॉ भुमेश्वर पटले, पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ताई ठवरे, पंचायत समिती सदस्य पुष्पलता दुर्गकर, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजहंस ढोके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराग कापगते, संजय खरवडे, पुरुषोत्तम हातझाडे, मिथुन टेंभुर्णे, लीलाधर खुणे, अनिल पुस्तोडे, गुरुदेव चांदेवार, तथा आठही गावातील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, व कार्यकर्ते तथा ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
भुमीपुजन झालेल्या आठही गावात अंतर्गत रस्ते,नाली बांधकाम, पेव्हींग ब्लाॅक बसविने, सभामंडप, व्यायामशाळा, अशा अनेक कामांचा समावेश आहे. या गावांसाठी सदर कामे विकासाची नांदी ठरनार आहेत.लवकरच सर्व कामे पुर्णत्वास येवुन ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल असी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.