निवडणूक खर्च निरीक्षक हर्षवर्धन यांनी घेतला आढावा नियंत्रण कक्षाला भेट

0
8

भंडारा, दि.21: भारत निवडणूक आयोगामार्फत 11-भंडारा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी हर्षवर्धन यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून काल त्यांनी भंडारा जिल्ह्यातील  खर्च विषयक कामांचा आढावा घेतला .यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे उपस्थित होते.

 श्री. हर्षवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विषयांसाठी नियुक्त केलेल्या खर्चविषयक नोडल अधिकाऱ्यांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून निष्पक्ष व निर्भय वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर प्रलोभन दाखवण्यासाठी कपडे ,दारू तसेच पैशांची वाहतूक म प्रमाणात होऊ शकते.

 त्या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश तईकर यांना व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचेही त्यांनी निर्देश दिले. मसोशल मीडियावर होणारा मोठ्या प्रमाणावर प्रचार पाहता त्याबाबतीत खर्चाची नियमित माहिती माध्यम कक्षा ने उपलब्ध करून देण्याची निर्देश त्यांनी दिले.

          तसेच लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयांनी कार्य करण्याचे निर्देश दिले.  त्यानंतर श्री. हर्षवर्धन यांनी नियोजन भवन येथे स्थापित नियंत्रण पक्षाला भेट दिली. त्यामध्ये त्यांनी अशी  सी विझील कक्ष ,आदर्श आचारसंहिता कक्ष आणि माध्यम प्रमाणीकरणकक्ष तसेच खर्च विषय काम करणाऱ्या खर्च खर्चविषयक समितीच्या कामांची माहिती घेतली.आज निवडणूक निरीक्षकांनी तुमसर येथेही भेट देऊन माहिती घेतली.

विधानसभा मतदारसंघ न्याय ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाटप

भंडारा,दि.२१ : ११- भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघांतर्गत भंडारा जिल्ह्याच्या ईव्हीएमचे प्रथम रँडमायझेशन ( सरमिसळ ) करण्यात आले. सदर रँडमायझेशन करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी, 11 भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघ तसेच जिल्हा अधिकारी भंडारा शयोगेश कुंभेजकर यांनी उपस्थित राजकीय पक्षांना प्रथम सरमिसळ किंवा  प्रथम रँडमायझेशनची माहिती दिली .

          त्यानंतर सदर रँडमायझेशन राजकीय पक्षांच्या समक्ष करण्यात आले आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम्स 138%  BU 138% CU आणि 148 % V V Pad  याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला निश्चित झाल्या. सदर  विधानसभा मतदार  संघ निहाय निश्चित झालेल्या ईव्हीएम ची यादी सर्व राजकीय पक्षांना समक्ष वाटप करण्यात आले. सर्वाचे आभार मानून सदर प्रथम रँडमायझेशन प्रक्रिया संपल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कुंभेजकर यांनी जाहीर केले.

६० _तुमसर विधानसभा मतदार विभागनिहाय बी यु -480, सी यू 480 आणि व्हीव्हीपॅट ५१५

६१ भंडारा बी यू  ५९७ , सि  यू ५९७ व्हीव्हीपॅट ४६०

६२ साकोली बी यु ५१७, सी यु ५१७ आणि व्हीव्हीपॅट ५५५

जिल्ह्यात एकूण 1594 बीयू 1594 सी यु आणि 1710 व्हीव्हीपॅट आहेत.दिनांक 19 मार्च रोजी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रथम सरमिसळ करण्यात आली त्यानंतर जिल्हा मुख्यालयातील स्ट्रॉंग रूम मधून दिनांक 20 मार्च रोजी काढून तुमसर भंडारा साकोली विधानसभा मतदारसंघांना वाटप करण्यात आले तसेच शासकीय धान्य गोदाम साकोली येथून जिल्हास्तरीय ईव्हीएम सुरक्षा कक्षातून वरील प्रमाणे युनिटचे वाटप करण्यात आलेले आहे.