भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 20 वर्षानंतर पंजा दिसणार

0
23

गोंदिया(खेमेंद्र कटरे) : भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात २००९ पासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होेत आलेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असते.राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर या मतदारसंघात अजित पवार गटाचे नेते पटेल यांचाच शब्द पक्षात अंतिम असतो.त्यांना नकार देण्याची सहज कुणी हिमंत करीत नाही,त्यामुळे सगळेच त्यांच्यासोबत गेले.यावेळी महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटणार हे निश्चित झाले.२००४ पासून गायब झालेला पंजा हा चिन्ह पुन्हा या मतदारसंघात २०२४ मध्ये दिसणार असून भाजप आणि काँग्रेस यांच्यातच खरी लढाई होणार हे स्पष्ट झाले आहे.त्यातच शरद पवार राष्ट्रवादी गटाने आधीच ही जागा काँग्रेसकरीता सोडल्याने या गटाकडून कुठली अडचण निर्माण होण्याची शक्यता नाही.
भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साक्षीने दावा कायम असल्याचे सांगून भाजपमधील इच्छुकांची धडधड वाढवत आपले वजन कायम‘ असल्ङ्माचे दाखवले.असेही राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून निवडणूक लढणारच नाही,हे सर्वश्रृत आहे.महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्यावतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त हाती आली आहे.पटोलेमुळे पुन्हा या मतदारसंघात नवा सामना बघावयास मिळणार आहे.
लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.मात्र भाजप व काँग्रेसकडून अधिकृतरित्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही,जी आज रात्री उशीरापर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्रात भाजपने २० उमेदवारांची यादी जाहिर केली.परंतू काँग्रेससह इतर पक्षानी आपल्या उमेदवारांच्या नावावर मंथनच सुरु ठेवले आहे.पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या नितीन गडकरींना दुसèया यादीत भाजपला स्थान द्यावे लागले.मात्र भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघाच्या नावावर मात्र ते शिक्कामोर्तब करु शकले नाही.खरं तर २०१४ मध्ये मोठ्याने पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी लोकसभेची निवडणुक लढविण्याचा विचारच केला नाही.कारण त्यांना विधानसभेतून राज्यसभेत जाण्याची संधी उपलब्ध झाल्याने.
या दोन्ही जिल्ह्यात जरी त्यांचे राजकीय वजन असले तरी हा मतदारसंंघ खरा भाजपच्या ताब्यातच आहे.त्यामुळे पटेलामुळे या मतदारसंघाच्या नावावर शिक्कामोर्तब अडकल्याची जी चर्चा सुरु आहे.त्या चर्चेलाच काही अर्थ नसून भाजपच्या उमेदवारामध्ये असलेल्या स्थानिक व बाहेरच्या या दोन मुद्यामुळेच खरं तरं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला नावावर शिक्कामोर्तब करण्यात अडचण चाललीय.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तिरोड्याचे आमदार विजय रहागंडालेंना एकदा नव्हे तर दोनदा लोकसभेकरीता विचारणा केली,मात्र त्यांनी आपण विधानसभेकरीताच इच्छुक असल्याचे स्पष्ट केल्याने खरी अ़़डचण केंद्रीय नेतृत्वासमोर झालेली आहे. राष्ट्रवादीचे नेते पटेलांना निवडणूक लढवायची नसली तरी त्यांनी शेजारचा गडचिरोली चिमूर मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा याकरीताच जोर लावलेला आहे.आणि हा मतदारसंघही भाजप पुर्व विदर्भात राष्ट्रवादीला देण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र आहे.जवळपास राष्ट्रवादीने आपल्या ज्या ६ उमेदवारांची नावे निश्चित केली,त्यामध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे.या मतदारसंघात काँग्रेसच्यावतीने गेल्या पाच वर्षापासून काम करीत असलेले डाॅ.एन.डी.किरसान यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.
भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली.यात विदर्भातील गडचिरोली, भंडारा-गोंदिया,बुलढाणा,अमरावती व यवतमाळ सोडले.भाजपने जे उमेदवार जाहीर केलेत त्यावरुन पुर्व विदर्भात त्यांनी तेली समाजाला वर्धा,ब्राम्हण समाजाला नागपूर,कोमठी(आर्य वैश्य)समाजाला चंद्रपूर हे मतदारसंघ निश्चित केले.पुर्व विदर्भात कुणबी व पोवार समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही.त्यामुळे भाजप भंडारा-गोंदिया मतदारसंघात कुणबी की पोवार काय निवडते यावरही तिकिट वाटपांच घोंडं अडून बसलंय खरं तर.
त्यातच भाजपमध्ये खरी लढाई उमेदवारीकरीता विद्यमान खासदार सुुनिल मेंढे व नागपूर निवासी माजी विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांच्यातच आहे.फुके यांनी आपली पुर्ण शक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लावलेली दिसून येत आहे.राज्यपातळीवरील उमेदवार निवडीच्या बैठकीतही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यमान खासदाराएैंवजी माजी आमदार फुकेंचीच बाजू अधिक घेतल्याची माहिती सुत्रानी दिली. त्यातच प्रफुल पटेलांचे पारडं कुुणाकडे झुकतं ते खरं महत्वाचं राहणार आहे.
भाजपमध्ये उमेदवारीसाठी अधिक स्पर्धा आहे. विद्यमान खासदार सुनील मेंढे, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आमदार हेमंत पटले यांच्यासह इच्छुकांची यादी लांब आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचे नाव दबावतंत्राचा वापर म्हणून चालवले जात आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार चरण वाघमारे, सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे चिरंजीव प्रशांत पडोळे, भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री बोरकर, चंद्रकांत निंबार्ते यांची नावेही चर्चेत आहेत.

दुसèया यादीत भंडारा गोंदिया मतदार संघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यात समावेश नसल्यामुळे या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांसह मतदारांचाही भ्रमनिरस झाला.अशातच समाज माध्यमांवर मात्र या इच्छुक उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्यांपुढे ‘भावी खासदार ‘ असे लिहून मिरवायला लागलेत.तर दुसरीकडे ‘मोदीजी सै बैर नहीः..लेकीन :ःःतेरी इसबार खैर नही ‘असेही स्लोगन समाजमाध्यमावर भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकारीपर्यंत लिहित असल्यानेच पक्ष नावावर शिक्कामोर्तब करण्यात घाई करीत नसल्याची खरी वस्तूस्थिती आहे.
दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या पक्ष संघटनेकडे बघितल्यास एकाही जिल्हाध्यक्षांने बुथलेवलपर्यंत काम केल्याचे दिसून येत नाही.परंतु उमेदवारीकरीता जे नावे समोर येत आहेत,त्या नावांचा वलय त्यांच्या गावाशेजारीच असून तालुक्याच्या काय तर जिल्ह्याच्या बाहेरही दिसून येत नसल्याने दोन्ही जिल्ह्यात नाना पटोलेंशिवाय दुसरा पर्यायच महाविकास आघाडीकडे उरलेला नाही.