बापलेकाच्या मृत्युने आमदार हळहळले,कुटुंबीयांचे केले सांत्वन

0
4

अर्जुनी मोर. – तालुक्यातील मोरगाव येथील बापलेकाचा दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेची माहीती मिळताच अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मृतकाचे घरी जावुन कुंटुबियांचे सांत्वन केले. यावेळी आमदार महोदयही हळहळले.
तालुक्यातील मोरगाव येथे शेताभोवती लावलेल्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यु झाला. ही घटना गुरुवारी ता.२१ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान मोरगाव शेतशिवारात घडली. वामण दुधराम हातझाडे वय ४८ ,व संतोष वामण हातझाडे वय १९ यांचा मृत्यू झाला. घरातले कर्ते पुरुष गेले.कुटुंबात चार लोक होते.उदरनिर्वाहापुरती शेती आहे.संसाराचा गाडा सुरळीत सुरु होता.अशातच घरातील दोन कर्त्या पुरुषांचा दुर्दैवी मृत्यु झाला.आता घरात फक्त पत्नी व मुलगी दोघेच उरले.पत्नी आजारपणामुळे व्यवस्थीत चालु शकत नाही. मुलगी शिक्षण घेत आहे. आता कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्याची जबाबदारी या दोघींवरच येवुन ठेपली आहे. मृतक यांचे घरी अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी २३ मार्च रोजी सांत्वना भेट दिली.यावेळी राष्टवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, विविध कार्य. सेवा सह.संस्था अर्जुनी मोर. चे अध्यक्ष ललीत बाळबुध्दे, व ग्रामवासी उपस्थित होते. कुटुंबाच्या मदतीसाठी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोर.चे तहशिलदार अनिरुध्द कांबळे यांना भ्रमणध्वनी वरुन कळविले.तसेच कृषी कार्यालया मार्फत स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेनुसार तात्काळ मदत मिळवुन देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना निर्देश दिले.