आजपासून यवतमाळच्या सत्यशोधक विद्यापीठात युवकांकरीता प्रशिक्षणाचे आयोजन

0
3

यवतमाळ,दि.29ः- येथील महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ सत्यशोधक नगरी चांदोरे नगर यवतमाळ येथे वैद्यकीय अभ्यासक्रम करीत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता प्रशिक्षणाचे आयोजन 29 ते 31 मार्च दरम्यान करण्यात आले आहे.खाणपान,जीवन जगण्याची कला ,ताण तणाव नियोजन, या विषयावर प्रा.काशिनाथ लाहोरे,कर्तव्याने घडतो माणूस, आकाशी झेप घे रे पाखरा,सकारात्मक दृष्टिकोन व कायझन तंत्र या विषयावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी आरक्षणाची संकल्पना प्रशासकीय व न्यायालयीन संघर्ष यावर डॉ.राऊत मार्गदर्शन करणार आहेत.भारतीय संतांचे जागृती कार्य,मनुस्मृतीनंतरचा भारत ,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष ,स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत, भारतातील प्रचलित विचारधारा नवभारतासाठी भूमिका व योगदान ,सामाजिक क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास वैदिक धर्म त्यांची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व्यवस्था, या विषयावर सत्यशोधक इंजि. अरविंद माळी यांचे मार्गदर्शन होणार आहे.महात्मा फुले पर्यायी संस्कृतीचे जनक, हम होंगे कामयाब या विषयावर डॉ.ज्ञानेश्वर गोरे,सोबतच जिंदगी ना मिले दोबारा या विषयावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत ,ओबीसीसह सर्व जातींची जनगणना या विषयावर डॉ.विलास लिलाबाई दशरथ काळे हे मार्गदर्शन करणार आहेत.मंडल पूर्वी व मंडल नंतरचा ओबीसी ,प्राध्यापक सुनीता विलास काळे हे मार्गदर्शन करणार आहेत.कौशल्य विकास गटचर्चा विषयांकित सादरीकरण याबाबत डॉ.गोरे, मायाताई गोरे ,डॉ.राऊत, डॉ.विलास काळे हे मार्गदर्शन करणार आहेत.हे विश्व आहे तरी केवढे या विषयावर स्काय वॉच ग्रुपचे रवींद्र खराबे हे मार्गदर्शन करणार आहेत.तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी विद्यापीठांमध्ये आलेले आहेत ,अशी माहिती मुख्य आयोजक डॉ.ज्ञानेश्वर गोरे यांनी दिलेली आहे.